कॉमेडियन मुश्ताक मर्चंट काळाच्या पडद्याआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सीता और गीता’, ‘हाथ की सफाई’, ‘जवानी दिवानी’ अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारणारे प्रसिद्ध कॉमेडियन मुश्ताक मर्चंट (67) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मुश्ताक यांनी ‘सागर’, ‘नसीबवाला’, ‘प्यार हुआ चोरी चोर’, ‘बलवान’, ‘हमशकल’ तसेच ‘शोले’ या चित्रपटांतही काम केले हेते. ‘शोले’ चित्रपटाची वाढलेली लांबी लक्षात घेता या चित्रपटातून त्यांच्यावर चित्रित झालेली दृश्ये वगळली होती. ‘प्यार का साया’ या चित्रपटाच्या पटकथेचे आणि ‘सपने साजन के’ या चित्रपटासाठी संवाद लेखन त्यांनी केले होते. 16 वर्षांपूर्वी त्यांनी चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ते धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असायचे.