आर्थर रोड कारागृहात ‘हनी’ची झाडाझडती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातदेखील विशेष खबरदारी घेण्यात आली होती. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू अथवा ड्रग्जचा शिरकाव झाला असेल तर ते शोधून काढण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या श्वानपथकाने कारागृहात कसून शोधाशोध केली.

चलाखीने अमली पदार्थ किंवा आक्षेपार्ह वस्तू कारागृहात शिताफीने आणल्या गेल्या तरी त्या वेळीच पकडल्या जाव्यात यासाठी कारागृह विभागाने स्थानिक पोलिसांच्या श्वानपथकाची मदत मागितली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाची हनी तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या श्वानाने थर्टी पर्स्टच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहात दोन दिवसांपूर्वी झाडाझडती घेतली. प्रत्येक बॅरेक तसेच कैद्यांच्या सामानांची दोन्ही श्वानांची तपासणी केली. दिवसभर केलेल्या तपासणीनंतर काहीच आढळून आले नाही.