
शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर येथील म्हाडाच्या भूखंडावर महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे. येथील गाळेधारकांच्या नावावर सदनिका करण्याकरिता आणि त्यांना म्हाडामध्ये समाविष्ट करण्यासाठी म्हाडाने स्वतः अधिकृत पत्रव्यवहार करून किती सेवाशुल्क आकारण्यात येईल याची माहिती स्थानिकांना द्यावी तसेच सेवाशुल्क भरल्यानंतर त्यांचा येणाऱ्या पुनर्विकासामध्ये सहभाग करून घ्यावा, असे आदेश म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी म्हाडा प्रशासनाला दिले आहेत. याबाबत एका आठवडय़ात पत्रव्यवहार करून स्थानिक नागरिकांना कळविण्यात येईल, असे म्हाडा अधिकाऱयांनी सांगितले.
गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर क्र. 1, 2 आणि 3 येथील म्हाडाच्या भूखंडावर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या 210 खोल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेने या गाळेधारकांचे भाडे शुल्क स्वीकारणे बंद करून सदनिका तुमच्या नावावर हस्तांतरणासाठी म्हाडासोबत संपर्प करा, अशी सूचना केली.
पुनर्विकासावेळी दोन हजार चौ. फूट जागा द्या
पुनर्विकास करताना स्थानिकांना दोन हजार चौरस फूट जागा द्यावी, अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली. यावेळी उपशाखा संघटक अश्विनी सव्रे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जितेंद्र इंगळे, गटप्रमुख प्रदीप त्रिपत, श्रेया जाधव, चंद्रकांत देसाई, दीपक गवणकर, शशी पांचाळ, महेंद्रा इंगवे उपस्थित होते.
म्हाडामध्ये काही रक्कम भरल्यावर सदनिका तुमच्या नावावर केली जाईल; परंतु तसा अधिकृत पत्रव्यवहार म्हाडाकडून स्थानिकांकडे केलेला नाही. यामुळे रहिवाशी संभ्रमात होते. त्यांनी विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांना संपर्प साधत परिस्थितीची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी घोसाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नुकतीच म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या दालनात म्हाडा आणि पालिका अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक झाली.


























































