एकनाथ शिंदे, अरविंद सावंत कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा आकडा वाढत असतानाच राज्यातील मंत्र्यांनाही मोठय़ा प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार अरविंद सावंत, आमदार प्रताप सरनाईक, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, खासदार सुजय विखे-पाटील यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली.

  • राज्यातील 13 मंत्री आणि 70 आमदार कोरोनाबाधित असल्याची माहिती पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

दिवसभरात

  • मुंबई – 10860
  • ठाणे – 1354
  • नवी मुंबई – 1116
  • कल्याण, डोंबिवली – 457
  • राज्य – 18466

आज सापडलेल्या 75 ओमायक्रोनच्या रुग्णांपैकी 40 मुंबई, 9 ठाणे महापालिका, 8 पुणे महापालिका, 5 पनवेल, नागपूर, कोल्हापूर प्रत्येकी 3, पिंपरी-चिंचवड 2 तर भिंवडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती, नवी मुंबई येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.