म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून परीक्षांच्या नवीन तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा आता 7, 8 व 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पीएसआयच्या मुख्य परीक्षेच्या तारखांनुसार म्हाडाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

म्हाडाची परीक्षा 29 व 30 जानेवारी रोजी होणार होती, मात्र याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे म्हाडाने परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या. त्यानुसार म्हाडाची क्लस्टर-6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गाकरिता परीक्षा 7, 8 व 9 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.