
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘बेस्ट स्टेट युटिलिटी’ पुरस्काराने आज महावितरणचा सन्मान करण्यात आला. ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणे, वीजहानी कमी केल्याने महावितरणला हा पुरस्कार देण्यात आला आहे तसेच ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 15 व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील 29 वीज वितरण कंपन्यांमधून विविध निकषांच्या आधारे महावितरणला हा पुरस्कार देण्यात आला. आज ऑनलाइन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या वतीने संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता महावितरण अत्यंत कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे उद्गार माजी केंद्रीय ऊर्जा सचिव अनिल राजदान यांनी काढले.





























































