
>> वृषाली पंढरी
संक्रांतीचा सण सामाजिक व शारीरिक आपापल्या क्षेत्रात पिकणारे सिझनल निगडित खा, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला, स्नेह वाढवा हा संदेश देणारा आहे. आपल्या देशात काही सण सर्वत्र साजरे होतात. राज्य बदलताच रीत बदलते, पण सण मात्र साजरा करण्यातील उत्साह तसाच असतो. तसाच मतभेद विसरून गोड बोलायला शिकवणारा, सर्व धर्मीयांनी साजरा करावा असा आगळावेगळा सण म्हणजे मकर संक्रांत.
मकर संक्रांतीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेव
उत्तर गोलार्धात प्रवेश करतो, ज्याला उत्तरायण म्हटले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की या दिवसापासून देवलोक म्हणजेच स्वर्गाचा दिवस सुरू होतो. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात.
हिंदू धर्मीयांची कालगणना चांद्रवर्षानुसार होत असल्याने त्यांचे सण दरवर्षी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या तारखेला येतात. पण संक्रांत मात्र दरवर्षी 14 जानेवारीला येते. याचे कारण म्हणजे चांद्र दिनदर्शिका व सौर दिनदर्शिका यांचा मेळ बसण्यासाठी केलेली शास्त्राrय तडजोड. चंद्रवर्षात 354 दिवस असतात तर सौर दिनदर्शिका ही 365 दिवसांची असते. हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास असतो. म्हणूनच सौर दिनदर्शिकेप्रमाणे संक्रांत ही नेहमी 14 जानेवारीला येते. संक्रांतीचे पुढे पुढे सरकण्याचे शास्त्राrय कारण पृथ्वीच्या परिक्रमेशी जोडलेले आहे.
पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱयाकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱयावरून बघितल्यास पृथ्वी घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.
पृथ्वी स्वतःभोवतीची एक प्रदक्षिणा 23 तास, 56 मिनिटे आणि 4.099 सेकंदात पूर्ण करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी 24 तासांत म्हणजे एका दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. प्रति दिवशी हा फरक 86,000 (24 तासांचे सेकंद)/365.25 (एका वर्षातील दिवस) 3 मिनिटे 56 सेकंद एवढा असतो. या फरकामुळे मकरसंक्रांतीच्या तारखा पुढे जात आहेत.
इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो. उपलब्ध माहितीनुसार या तारखा पुढीलप्रमाणे असून शंभर वर्षांत एक दिवस हा सण पुढे गेल्याचे दिसते.
- इसवी सन 1600 मध्ये ः 9 जानेवारी
- इसवी सन 1700 मध्ये ः 10 जानेवारी
- इसवी सन 1800 मध्ये ः 11 जानेवारी
- इसवी सन 1850 साली 12 जानेवारी
मकर संक्रांती म्हणजेच सूर्याचा मकर राशीत प्रवेश या वर्षी 14 जानेवारीला दुपारी 2ः29 वाजता होणार आहे. अशा परिस्थितीत, शास्त्राrय मान्यतेनुसार, या वर्षी मकर संक्रांतीच्या स्नानाचा पवित्र कालावधी सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत राहील. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. महाभारतात पितामह भीष्म युद्धात जखमी झाल्यावर बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला, ही कथा प्रसिद्ध आहे.
आपल्या देशात काही सण सर्वत्र साजरे होतात. राज्य बदलताच रीत बदलते, पण सण मात्र साजरा करण्यातील उत्साह तसाच असतो. तसाच मतभेद विसरून गोड बोलायला शिकवणारा, सर्व धर्मीयांनी साजरा करावा असा आगळावेगळा सण म्हणजे मकर संक्रांत.
मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. सौर कालगणनेशी संबंधित हा एक महत्त्वाचा भारतीय सण. आपली संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे, फळांचे वाण (भेटवस्तू) एकमेकांना स्त्रिया देतात. हरभऱयाचे घाटे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवालाही अर्पण करतात.
शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळामध्ये शरीरासोबतच सौंदर्याला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे तिळगुळाचे लाडू खाल्ल्यास थंडीमध्ये रुक्ष झालेली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळे सौंदर्य वाढण्यासदेखील मदत होते. तिळामध्ये अस्तित्वात असलेली कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम ही द्रव्ये हृदयासाठी फायदेशीर ठरतात. खाण्यात तिळाच्या तेलाचा वापर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासही मदत होते. त्यामुळे निरोगी हृदयासाठी तिळाचे सेवन करणे फायदेशीर आहे.
तीळ आणि गूळ हे दोन्हीही उष्ण पदार्थ आहेत. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ उपयुक्त असते. तसेच उष्ण असल्याने बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात या निमित्ताने केला जातो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण-घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे असा उदात्त हेतू या सणामध्ये दडला आहे.
तिळातील लोह आणि कॉपर शरीरातील लोहाच्या अभिशोषणास मदत करते व संधीवातासारख्या विकारांवर उपयुक्त ठरते. या गुणधर्मामुळेच तिळाचे तेल मसाजसाठी वापरले जाते. एका संशोधनामध्ये असे समोर आले आहे की, तिळामध्ये सेसमीन नावाचे एक ऍण्टीऑक्सिडंट आढळून येते. जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करते. यामुळे लंग कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, ल्यूकेमिया, प्रोटेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या कॅन्सरवरच्या उपचारांवर परिणामकारक ठरते.
मकर संक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो. यावेळी देशात विविध ठिकाणी पूजाअर्चा, विशेष गंगास्नान, दानधर्म केला जातो. यातून गरिबांना, गरजूंना मदत मिळते. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी. त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्त्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो असा एक समज आहे. बहुसंख्य स्त्रिया उपयोगी भेटवस्तू दान करतात. त्यातून एकत्र येणेही होते व सुखदुःखाची देवाणघेवाण होते. अशा रीतीने संक्रांतीचा सण सामाजिक व शारीरिक आपापल्या क्षेत्रात पिकणारे सिझनल निगडीत खा, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला, स्नेह वाढवा हा संदेश देणारा आहे.





























































