तालसम्राट भानुदास महाराज ढवळीकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारकरी संप्रदायातील तालसम्राट तथा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजचे माजी अध्यक्ष ह.भ.प. भानुदास महाराज ढवळीकर (अण्णा) (वय 88) यांचे निधन झाले.

भानुदास महाराजांच्या निधनाने शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर वारकरी संप्रदाय नियमानुसार चंद्रभागातीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातू तसेच पणतू मृदंगविशारद ह.भ.प. देवीदास महाराज ढवळीकर, रामदास महाराज आहेत.

भानुदास महाराज यांनी मृदंगाचे प्राथमिक शिक्षण वडील जनार्दन महाराज ढवळीकर, तर शास्त्राrय तबला व मृदंग शिक्षण वै. गोडबोले गुरुजी यांच्याकडून घेतले होते. भानुदास महाराज यांना वारकरी संप्रदायातील ‘तालसम्राट’ हा पुरस्कार तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. तसेच देहूकर फडाच्या वतीने दिला जाणारा ‘सांप्रदायिक मृदंग सेवा पुरस्कार’, समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीने ‘मृदंगाचार्य पुरस्कार’, ‘मृदंग महामेरू पुरस्कार’, ‘जय मृदंग पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दिंडीमध्ये तसेच तळावरील पालखीसमोरील मानाच्या कीर्तनसेवेत सलग 25 वर्षे मृदंग वादन सेवेचा अनोखा विक्रम भानुदास महाराजांनी केला होता.