पृथ्वी तापली! 2021 ठरलं सर्वात उष्ण वर्ष…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
earth heating

गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीचे तापमान हे सातत्याने वाढत आहे. अशातच 2021 हे सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची माहिती समोर येत आहे. हिंदुस्थानच्या हवामान विभागने (IMD) सांगितलं आहे की, 2021 हे सर्वात उष्ण वर्ष होत. 1901 नंतर हे पाचवं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. 2021 मध्ये देशातील सरासरी वार्षिक हवेचे तापमान सामान्यपेक्षा 0.44 अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे. हवामान विभागाने सांगितलं की, चक्रीवादळ, भूस्खलन आणि वीज पडून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 1,750 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागाच्या वार्षिक अहवालात (2021) सांगण्यात आलं आहे की, 1901 ते वर्ष 2021 दरम्यान देशात 2009, 2010, 2016 आणि 2017 नंतर हा पाचवा सर्वात उष्ण वर्ष ठरला आहे. देशात 2021 मध्ये सरासरी तापमान सामान्यपेक्षा 0.44 अंश सेल्सिअस अधिक नोंदवण्यात आले आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, हिवाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या हंगामातील उष्ण तापमानाने यात प्रामुख्याने भर घातली आहे.

हवामान खात्याने सांगितलं आहे की, 2016 मध्ये देशात सरासरी तापमान 0.710 अंश सेल्सियस अधिक होते. 2009 आणि 2017 च्या सरासरी तापमानापेक्षा हे अनुक्रमे 0.550 अंश आणि 0.541 अंश जास्त होते. तर 2010 मध्ये सरासरी वार्षिक हवेचे तापमान सामान्यपेक्षा 0.539 अंश जास्त होते. 2021 मध्ये हिंदुस्थानात चक्रीवादळ आणि वीज पडून 787 लोकांचा मृत्यू झाला, तर याच वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे 759 लोकांचा मृत्यू झाला, असे हवामान विभागाने म्हटले आहे.