‘या’ क्रिप्टोकरन्सीमुळे गुंतवणूकदार मालामाल; आठवड्याभरात एका हजाराचे झाले तीन हजार कोटी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक वाढत आहे. तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यात दररोज होणाऱ्या बदलांमुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. तर काही गुतंवणूकदार मालामाल होत आहेत. बिटकॉइन आणि अथेरम या मुखअय प्रवाहातील क्रिप्टोकरन्सी आहेत. तर सध्या मीमकॉइन आणि अल्टकॉइन यांची चर्चा आहे. मात्र, सध्या नव्याने आलेल्या क्रिप्टो टोकनने सर्वांनाच चकीत केले आहे. आता एकता या टोकनची चर्चा असून या टोकनने आठवड्याभरात तब्बल 2.9 अब्ज टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

कॉइनमार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार एकता टोकनचे मूल्य आठवड्याभरापूर्वी 0.00000001396 डॉलर होते. ते आता 0.4039 डॉलर झाले आहे. एका आठवड्यात यात 2,893,266,376 टक्क्यांनी तेजी आली आहे. म्हणजेच आठवड्याभरापूर्वी यात 1 हजार रुपये गुंतवले असते तर त्याचे आता 2,989.32 कोटी रुपये झाले असते. एवढी जबरदस्त तेजी या टोकनमध्ये आली आहे.

एकता टोकनच्या वेबासाइटवर असलेल्या माहितीनुसार याचे फिजिकल एसेट्स आणि कम्यूनिटीज ऑन चेन बनवण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. या टोकनची लवकरच लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. आठवड्याभरात जबरदस्त तेजी असूनही हे टोकन त्याच्या ऑल टाईम हायपेक्षा खालीच आहे. ऑल टाईम हायपर्यंत जाण्यासाठी अजून याला 96 टक्क्यांच्या वाढीची गरज आहे.

सध्या या टोकनचा क्रिप्टोमार्केटमध्ये कमी सहभाग आहे. त्याचा एमकॅप 50 लाख डॉलरपेक्षाही कमी आहे. सध्या याचे 12,097,924 टोकन चलनात आहेत. प्रोजक्ट डिटेल्सनुसार ते अजून जास्तीतजास्त 420,000,000 टोकन चलनात आणू शकतात.