शिवभोजनासाठी 45 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाकाळात शिवभोजन थाळी हाच कष्टकऱयांचा आधार बनला. आजही लाखोंच्या संख्येने नागरिक या शिवभोजन थाळीचा लाभ घेत असून राज्य सरकारने या पेंद्रासाठी लागणाऱया 45 कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतरही केंद्र चालकांना निधी वितरित झाला नव्हता. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातदेखील यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून शिवभोजन योजनेसाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातील 45 कोटी रुपयांच्या अनुदानास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. हा निधी मंजूर करताना वित्त विभागाने अटी व शर्ती घालून दिल्या असून इतर कोणत्याही प्रयोजनासाठी हा निधी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.