
भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मानखुर्दच्या टि जंक्शन येथे घडली. याप्रकरणी अपघाताची नोंद करून मानखुर्द पोलिसांनी क्रेन चालकाला अटक केली आहे.
गौरव यादव (35) असे त्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गौरव त्याच्या दुचाकीवरून शीव-पनवेल मार्गाने जात असताना वेगात आलेल्या क्रेनने त्याला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गौरवचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी याज्ञिक फातुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 304 (अ), 279 अन्वये गुन्हा दाखल करून क्रेन चालकाला अटक केली.



























































