
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय आठ दिवसांनी घेण्याची सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. कोणीही गाफील राहू नये. पंढरपूर, माळशिरस, बार्शी, करमाळा, माढा या पाच तालुक्यांत रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांची लक्षणे सौम्य असली, तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.



























































