व्हेक्टर कोचिंग क्लासने 14 विद्यार्थ्यांना गंडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी पूर्व परीक्षेच्या तयारीसह खासगी शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी व्हेक्टर कोचिंग क्लासच्या नितेश पारेख आणि अभय भगेलला अटक केली आहे. आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून हा आकडा आणखीनच वाढणार आहे.

तक्रारदाराच्या दोन मुलांना आयआयटीत प्रवेश घ्यायचा होता. मुलासाठी त्याने तुंगा गाव येथील व्हेक्टर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. साडेआठ लाख रुपये फी भरली होती. 2019 मध्ये सुरुवातीला क्लासेस नियमित सुरू होते. दिवाळीनंतर खासगी शिक्षकांनी घरी शिकवणी घेणे बंद केले. वारंवार विचारणा करून देखील प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तक्रारदार यांनी तुंगा गाव येथे जाऊन चौकशी केली असता क्लासेसचे ऑफिस बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार यांच्यासह काही पालकांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. 38 लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.