पाच लाखांच्या परदेशी सिगारेट केल्या जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंदी असलेल्या परदेशी सिगारेटच्या तस्करीचा प्रकार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी कारवाई करून चार लाख 68 हजार रुपयांच्या सिगारेट जप्त केल्या आहेत.

रविवारी सकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश भापकर हे मुख्य टर्मिनसच्या फलाट क्रमांक 3/4 येथे गस्त करत होते. तेव्हा एक जण हातगाडीवर गोण्या घेऊन घाईगडबडीत जात असल्याचे भापकर यांना दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने भापकर याने याची माहिती डिटेक्शन स्टाफला दिली. त्यानंतर डिटेक्शन स्टाफने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी केल्यावर पोलिसांनी ती गोणी उघडून पाहणी केली असता त्यात गुदाम गरम सिगारेटची पाकिटे होती. जप्त केलेल्या सिगारेट्स या दिल्लीहून ऑगस्टक्रांती एक्स्प्रेसने मुंबईत आणल्या गेल्या होत्या. सिगरेट तस्करी प्रकरणी एका जणाविरोधात कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.