सोनालीचे छोट्या पडद्यावर कमबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सोनाली बेंद्रे हिला कर्करोग झाला असून तिच्यावर न्यूयॉर्क येथे उपचार सुरू आहेत.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे ‘डी. आय. डी. लिटिल मास्टर्स सीझन 5’ ची परीक्षक म्हणून छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करणार आहे. जुलै 2018 मध्ये कर्करोग झाल्यानंतर सोनालीने टीव्ही शो सोडला होता. आता चार वर्षांनंतर ती परत आली आहे.
कमबॅकबद्दल सोनाली म्हणाली, मी खूप अशक्त झाले होते. मी बरे होणे आवश्यक होते. म्हणून मी माझी ताकद परत मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. मी न्यूयॉर्कहून परत आले. तेव्हा मी व्हीलचेअरवर आले, पण मला एअरपोर्टबाहेर असे चालायचे नव्हते. म्हणून मी माझ्या नवऱयाचा हात धरला आणि ठरवलं की, मी व्हीलचेअरशिवाय बाहेर फिरणार नाही.

रिऍलिटी शो शारीरिकदृष्टय़ा खूप गडबडीचे, धावपळीचे असतात. त्यासाठी अनेक तास शूटिंग करणे अपेक्षित असते. मला वाटतंय, मी आता बरी आहे. सोनालीचा शो येत्या 12 मार्चपासून रात्री 9 वाजता झी टीव्हीवर सुरू होत आहे. सध्या आपल्या ‘लुक्स’बद्दल जास्त विचार करत नसल्याचे सोनालीने सांगितले. ती म्हणाली, असे काही क्षण असतात, जेव्हा मी कशी दिसते याबद्दल असुरक्षित वाटते, पण ही एक प्रक्रिया आहे, जिथे मी स्वतःला सांगते की, मी एकटी नाही. मी एक व्यक्ती म्हणून काय आहे आणि जगासाठी काय करते याला महत्त्व आहे.