अमेरिकेतील 40 विद्यापीठांत जैन अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी 693 ठिकांणी सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यापैकी 34 घटना या शाळांमध्ये घडल्या आहेत. या हिंसक घटनांमुळे तेथील नागरिकही आता कंटाळलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थीदशेतच मुलांमध्ये अहिंसेची भावना निर्माण व्हावी, या हेतूने आता अमेरिकेतील चाळीस विद्यापीठांमध्ये जैन धर्माचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तर, यामध्ये अहिंसा व सात्विक आहार या विषयावरही विशेष भर देण्यात येणार आहे.

फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन नॉर्थ असोशिएन नॉर्थ अमेरिकेने (जैन) सादर केलेल्या या प्रस्तावावर आता चाळीस विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. जैन धर्मावर पीएच.डी. तसेच अहिंसा व सात्विक आहार या विषयावर स्वतंत्र अभ्यासक्रम असणार आहेत. पीएच.डी.सह तीसहून अधिक जैन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

विस्कॉन्सिन विद्यापीठ, कनेक्टिकट विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, फ्लोरिडा विद्यापीठ, इलिनॉय(अर्बाना) विद्यपाठ, कॅरिटॉस कम्युनिटी कॉलेज आदी चाळीस विद्यापीठांमध्ये जैन धर्मावर आधारित अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याशिवाय इस्त्रायल, आखाती देश आणि आशियातील इतर देशांमधील विद्यापीठांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू होतील. हिंदुस्थान बीएचयू आणि नालंदा विद्यपीठातदेखील प्रस्ताव दिला जाणार आहे.

अमेरिका व कॅनडामध्ये सुमारे दीड लाख जैन आहेत. जैन संस्था अमेरिका, कॅनडा, युरोपमधील विविध विद्यापीठांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी लागणारा खर्च अमेरिकेत राहणाऱ्या जैन कुटुंबांनी दिलेल्या निधीतून केला जातो. या निधीतून जैन धर्मावरील संशोधन, प्राध्यापकांसाठी संस्कृत, प्राकृत आणि हिंदी भाषेतीस स्पेशलायझेशन करणे, अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थांची शिष्यवृत्ती आदींचा समावेश आहे.

40 कोटी रूपये खर्च होणार :

या कामासाठी सुमारे 450 कोटी खर्च होणार आहेत. जैन बांधवांनी दिलेल्या देणगीतून उभारलेल्या पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रूपये खर्च होतील. तर शिकागो येथे राहणारे मूळचे गुजरातचे डॉ. जसवंत मोदी यांनी 96 कोटी रूपायांची देणगी दिली. दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठ तीनशे कोटी रूपये खर्च करेल.

“अलीकडे व्हेगन आणि अहिंसा यासारख्या शब्दांचा वापर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये वाढला आहे. आज समाजात शाकाहारीचा कल वाढत आहे. जैन धर्म हजारो वर्षापासून तेच सांगत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जैन धर्माची माहिती पोहोचावी, असे आम्हाला वाटते. त्यामुळे त्याचे अभ्यासक्रम विविध विद्यापीठां सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.”

– डॉ. होण्यासाठी जैन, अध्यक्ष, जैन.