
हल्ली कुठलाही पत्ता शोधायचा म्हटलं तर लोकांची पहिली पसंती गुगल मॅपला असते. हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. प्रवासादरम्यान नेटवर्क प्रॉब्लेममुळे अनेकदा हे ऍप वापरण्यास अडचण येते. परंतु इंटरनेटशिवायदेखील आपण गुगल मॅप आपण वापरू शकतो. फक्त त्यासाठी तो मॅप डाऊनलोड करावा लागतो.
ऑफलाईन मॅप वापरण्यासाठी सर्वात आधी स्मार्टफोनवर गुगल मॅप ओपन करा. होम क्रीनवर उजव्या बाजूला प्रोफाईलच्या आयकॉनवर क्लिक करा. तिथे ऑफलाईन मॅप हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यावर आपल्याला कुठून कोठे जायचे आहे याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर डाऊनलोडवर टॅप करून मॅप सेव्ह करा. अशाप्रकारे ठराविक दिवसांसाठी मॅप डाऊनलोड केला जाऊ शकतो.





























































