
टीम इंडियाचा माजी गोलंदाज एस श्रीसंतने देशाअंतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीसंत नुकताच केरळकडून रणजी मालिका खेळला होता.
For the next generation of cricketers..I have chosen to end my first class cricket career. This decision is mine alone, and although I know this will not bring me happiness, it is the right and honorable action to take at this time in my life. I ve cherished every moment .❤️🏏🇮🇳
— Sreesanth (@sreesanth36) March 9, 2022
पुढच्या पिढीच्या क्रिकेटपटूंसाठी मी माझं प्रथम श्रेणीतील क्रिकेट करिअर इथेच थांबवायचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्या एकट्याचा आहे. हा निर्णय घेताना मला बिलकूल आनंद होत नाहीए. मात्र माझ्या आयुष्याच्या या वेळेत हा निर्णय घेणं अतिशय योग्य आहे. मी या करिअरमधील सर्व क्षण जगलो आहे., असे ट्विट श्रीसंतने केले आहे.
2013 मध्ये झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर कारवाई करत बीसीसीआयने आजीवन क्रिकेटबंदी घातली होती. त्यानंतर ही आजीवन बंदी उठवून त्याच्यावर सात वर्षांची बंदी लागू केली होती. हा बंदीचा कालवधी 13 सप्टेंबर 2020 मध्ये संपला तेव्हापासून तो रणजी क्रिकेट खेळत होता.
श्रीसंतने 2005 मध्ये श्रीलंकाविरुद्धचा सामन्यात नागपूर वनडेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. श्रीसंतने 27 कसोटी सामन्यात 37.59 सरासरीने 87 गडी बाद केले आहे. तर एकदिवसीय 53 सामन्यात 33.44 च्या सरासरीने 75 गडी बाद केले आहेत.



























































