ST Bus – एसटीचे विलीनीकरण नाहीच, मंत्रिमंडळाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आज मंत्रिमंडळाने स्वीकारला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय अहवालात एसटी कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी समजणे आणि महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सरकारच्या विभागामार्फत करणे ही मागणी मान्य करणे कायद्यातील तरतुदीनुसार तसेच प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबी विचारात घेता शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱयांना भरघोस पगारवाढ दिल्यानंतरही विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला संप एसटी कर्मचाऱयांनी सुरूच ठेवला आहे. विलीनीकरणाबाबत नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला.

सरकार विधिमंडळात भूमिका मांडणार

एसटी महामंडळासंदर्भात सरकार आपली भूमिका विधिमंडळात मांडणार आहे. विरोधी पक्षाकडूनही याविषयीची मागणी करण्यात आली तेव्हा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दोन दिवसांत निवेदन करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.