दहावीच्या विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मुत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

अहमदपूर तालुक्यातील बेलूर या गावातील इयत्ता 10 वी वर्गात शिकणाऱ्या रमण सुखदेव सुर्यवंशी (16) या विद्यार्थ्याचा नांदुरा (बु) येथील साठवण तलावात बुडून दुर्दैवी मुत्यू झाला. ही घटना मंगळवार 22 मार्च रोजी घडली.

रमण सुर्यवंशी हा सध्या 10 वी वर्गाच्या परीक्षा देत होता. तो कै. के. बी. पाटील विद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, 2 बहिणी असे कुटुंबातील सदस्य आहेत.

एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक मुत्युमुळे परिसरात सुर्यवंशी परिवाराबदल हळहळ व्यक्त होत आहे. अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सी.एस. कामटेवाड याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई तानाजी आरदवाड हे करत आहेत.