मध्य रेल्वेतील टीसीने वर्षभरात मिळवला एक कोटींचा महसूल; कोटींचा महसूल मिळवणारे तिसरे टीसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विभागात विनातिकीट प्रवासी आणि नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते. 2021-22 या आर्थिक वर्षात रेल्वे प्रशासनाला एक कोटींपेक्षआ जास्त महसूल मिळवून देणाऱ्या टीसीमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला एक कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवून देणारा तिसरा टीसी मिळाला आहे.

सुनील नैनानी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मोन लाईन बॅच 4 येथे कार्यरत आहेत. 1-2-2021 ते 27-3-2022 या काळात त्यांनी तिकीट तपासणीद्वारे 1.04 कोटी रुपये कमावले आहेत. अशी कामगिरी करणारे ते मध्य रेल्वेमील तिसरे टीसी ठरले आहेत.