चंद्रपुरातील जलविद्युत निर्मिती संपामुळे ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा येथील वीज केंद्रावर मोठा परिणाम झाला असून 60 मेगावॅट क्षमतेचे पाच जलविद्युत युनिट बंद झाले आहेत. तसेच 500 मेगावॅट क्षमतेचा सहा क्रमांकाचा एक संच तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी दुपारी बंद झाला. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेचे उत्पादन घटले असून सर्वसामान्यांना याची झळ बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वीज कर्मचारी संपावर असल्याने जलविद्युत युनिट चालवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे ही वीजनिर्मिती बंद करावी लागली. तर तांत्रिक कारणामुळे बंद पडलेला 500 मेगावॅटचा संच 30 मार्चपर्यंत दुरूस्त होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.