पावसाचा थेंबन् थेंब अडवण्यासाठी शपथ, पालघर जिल्हा होणार पाणीदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टंचाईग्रस्त, कोरडवाहू अशी असणारी पालघर जिल्ह्याची ओळख पुसून ती पाणीदार जिल्हा करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठोस पावले उचलली आहेत. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून येणाऱ्या पावसाळ््यात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. यानुसार पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब अडवण्यासाठी ‘कॅच द रेन’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून प्रत्येक गावात हे पथक पाणी अडवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. तशी शपथच ग्रामस्थांना दिली जाणार आहे.

पावसाचे पाणी संकलन करण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्पâत ‘कॅच द रेन’  अभियान हाती घेतले आहे. राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत, जलशक्ती मंत्रालय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या वतीने नॅशनल वॉटर मिशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आणि शासकीय कार्यालये तसेच ग्रामस्तरावर ‘कॅच द रेन’अंतर्गत शपथ दिली जाणार आहे. याची सुरुवात आज पालघर जिल्हा परिषदेत कर्मचाNयांना जल शपथ देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे,  जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, प्रकाश निकम, देवानंद शिंगडे, विनया पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, तुषार माळी, संघरत्ना खिल्लारे आदी उपस्थित होते.

नेमके काय करणार?

‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जेथे शक्य असेल तेथे पावसाच्या पाण्याचे संकलन केले जाणार आहे. यामुळे जमिनीतील भूगर्भातील पाणी साठा वाढेल. शिवाय जिथे पाणी पडते तिथेच अडवणे, सर्व शासकीय इमारतींचे जलसंवर्धन करणे, विहिरी, बोअरवेल यांचे संवर्धन करणे आदी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. यामुळे उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई कमी होऊन प्रत्येक गावाला पुरेसे पाणी उपलब्ध होईल