संजीव चिम्मलगी यांचे गायन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे 3 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध गायक संजीव चिम्मलगी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांना तबल्याची साथ पंडीत विश्वनाथ शिरोडकर करतील आणि हार्मेनियमची साथ सीमा शिरोडकर यांची आहे. कार्यक्रम केंद्राच्या वा .वा. गोखले या वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात येईल. चिम्मलगी यांच्या गायकीत किराणा घराणे, ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायकीचा मिलाफ जाणवतो. त्यांनी कर्नाटक संगीताची तालीम घेतली आहे.