बॅरिऍट्रिक सर्जरी आणि मानसिक आरोग्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. केदार पाटील

बैठी जीवनशैली, जंक फूडचं सेवन आणि व्यसन यामुळे लठ्ठपणा वाढतोय. वाढत्या लठ्ठपणावर व्यायाम व डाएट हा उत्तम पर्याय आहे, पण अनेकांना ते शक्य नसते. काही वेळा वजन खूप जास्त असते आणि लवकर आटोक्यात आणले नाही, तर गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे तो म्हणजे बॅरिऑट्रिक सर्जरी, परंतु बहुतांश लोकांना या शस्त्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नसते. लठ्ठपणामुळे त्रस्त असणाऱ्या या व्यक्ती मानसिकदृष्टय़ा अक्षरशः खचून गेलेल्या असतात. अशा स्थितीत रुग्णाला धीर देण्यासाठी बॅरिऑट्रिक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मानसिक आरोग्य तपासणी खूप गरजेचं आहे.

लठ्ठ मंडळींसाठी बॅरिऑट्रिक सर्जरीमुळे वजन नियंत्रणात राहते. अनेक गंभीर आजारांपासून स्वतःला वाचवता येते. जर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारासारख्या एखाद्या गंभीर आजाराचा त्रास सतावत असेल तर अशा रुग्णांना बॅरिऑट्रिक सर्जरीचा सल्ला दिला जातो. बॅरिऑट्रिक सर्जरीत लॅप्रोस्कोपी तंत्राचा (दुर्बिणीचा) वापर केला जातो. जठर आणि लहान आतडं यांचा आकार मर्यादित प्रमाणात कमी केला जातो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी स्लीव्ह गॅस्ट्रोटोमॅमी आणि गॅस्ट्रिक बायपास करावी लागते. म्हणूनच शस्त्र्ाक्रियेपूर्वी शारीरिक आरोग्यासोबतच तुमच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. बॅरिऑट्रिक शस्त्र्ाक्रियेपूर्वी डॉक्टर रुग्णाचे समुपदेशन करण्यासह त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करतात. या तपासणीत शस्त्र्ाक्रियेआधी रुग्ण शारीरिक व मानसिकदृष्टय़ा तयार आहे की नाही हे पाहिले जाते. रुग्णाच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकले जातात. शस्त्र्ाक्रियेपूर्वी आणि नंतर रुग्णाला मित्र आणि कुटुंबीयांकडून भक्कम पाठिंबा मिळेल याची खात्री करून दिली जाते. तसेच आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेआधी थेरपीसुद्धा सुचविली जाते.

ट्रिगर्स, आव्हाने, वजन वाढण्याची कारणे आणि खाण्याचे विकार यांचे विश्लेषण करण्यासाठी योग्य मूल्यमापन केले जाते. शस्त्रक्रियेनंतर मानसिक, वर्तणूक आणि नातेसंबंधातील बदलांना सामोरे जाण्यास तयार आहे का याबाबत प्रयन विचारले जातात. रुग्ण शस्त्रक्रिसाठी तयार आहे आणि पुरेसा आत्मविश्वास आहे. तरच त्याला/तिला शस्त्र्ाक्रिया करण्याची शिफारस केली जाते. रुग्णांना चांगल्या मानसिक आणि भावनिक आधाराची आवश्यकता आहे. बॅरिऑट्रिक शस्त्र्ाक्रियेनंतर निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य तो बदल, व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे.
(लेखक अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे येथील बॅरिऑट्रिक सर्जन आहेत)