पोलिसात तक्रार केली म्हणून बलात्कार पीडितेला खांबाला बांधून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओ़डीशामधील नारायणपूर येथे एका बलात्कार पीडितेला पोलिसांत तक्रार केली म्हणून आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली आहे. ही पीडिता अल्पवयीन असून या प्रकरणी पोलिसांनी पाच महिला व तीन पुरुष अशा आठ जणांना अटक केली आहे.

दहावीत शिकणाऱ्या या पीडितेवर गावातीलच 21 वर्षीय तरुणाने तीन महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. या प्रकरणी गावातील पंचांनी मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार न देण्याचा सल्ला दिला होता. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे आरोपीचे कुटुंबीय खवळले त्यांनी पीडित मुलीला एकट्या गाठले व तिला वीजेच्या खांबाला बांधले. त्यानंतर त्यांनी तिला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत आणखी एक तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी बलात्काराचा मुख्य आरोपीसहीत त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी SCST कायदा व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.