नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर पोलिसांचा वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर करडी नजर ठेवण्यास तसेच अशा बारवर वेळीच कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी पोलीस दलास दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून संजय पांडे यांनी नागरिकांसाठी नवनवीन सुविधा अमलात आणण्याचा धडाका लावला आहे. इतकेच नाही तर नियम न पाळणारे बार, ड्रग्जची खरेदी-विक्री करणारे, रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱयांविरोधात पांडे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने नियमांपेक्षा जास्त तरुणींना ठेवणाऱ्या बारवर कारवाया सुरू केल्या. अनेक तरुणींची सुटका केली. त्यामुळे बारवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई करा, आपापल्या हद्दीतील बारवर वॉच ठेवा, अशा सूचना पोलीस ठाण्यांबरोबर गुन्हे शाखेच्या सर्व युनीटला देण्यात आल्या आहेत. बारव्यतिरिक्त ड्रग्जच्या धंद्याचे कंबरडे मोडण्यासही आयुक्तांनी गंभीरतेने घेतले आहे. पोलीस ठाणीच नाही तर गुन्हे शाखेलादेखील ड्रग्जविरोधात कारवाया करण्यास सांगितले आहे. फक्त पेडलर्स नाही तर नशा करणाऱ्यावरदेखील कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.