
कुख्यात सुरज ठोंबरे टोळीतील सराईत तडीपाराला घातक शस्त्रासह अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश आले आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. अजिंक्य संतोष काळे (वय 21 रा आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा, गंभीर दुखापत, तोडफोडीसारखे तीन गुन्हे दाखल आहेत.
सराईत गुंड अजिंक्य काळे हा कोयता घेऊन आंबेगाव पठार गणेशनगर याठिकाणी येणार असल्याची माहिती युनिट दोनला मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला असता पोलीस अमंलदार नामदेव रेणुसे यांनी त्याच्या अंगावर झडप टाकून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी त्याला पुणे, पिंपरी चिंचवड जिल्हयातुन दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. ही कामगिरी एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, राजेन्द्र पाटोळे, यशवंत आंब्रे, नामदेव रेणुसे, अस्लम पठाण, निखील जाधव, मोहसिन शेख, नागेश राख यांनी केली.
अजिंक्य काळे टोळी तडीपार
टोळी प्रमुख यश प्रशांतसिंग साहोता वय 21, दिपक किसन तोरणकर वय 23, आकाश बापु म्हस्के वय 24, निखील सखाराम आखाडे वय 26 , ओंकार श्रीनाथकटके वय 26, जयेश शिवलाल परमार वय 19, स्वप्निल उत्तम उबाळे वय 20 (सर्व रा-आंबेगाव पठार, मोहननगर) अशी तडीपार केलेल्याची नावे आहेत.


























































