कार्यालयांसाठी भाडय़ाच्या जागेच्या मागणीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कार्यालयांसाठी भाडय़ाच्या जागेच्या मागणीत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कार्यालये भाडय़ाने घेण्याच्या व्यवहारांमध्ये तब्बल 97 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षी सुमारे एकूण 11.4 दशलक्ष चौरस फुटांच्या गाळय़ांचे भाडेतत्त्वावर व्यवहार झाले. मुंबईतील भाडे व्यवहारामध्ये बीएफएसआय फर्म्स आघाडीवर असून त्यांचा वाटा 24 टक्के आहे. त्या खालोखाल फ्लेक्झिबल स्पेस ऑपरेटर (21 टक्के) आणि अभियांत्रिकी व उत्पादन कंपन्यांचा क्रमांक (16 टक्के) लागतो. या तिमाहीमध्ये एकूण 0.8 दशलक्ष चौरस फुटाचे भाडे व्यवहार पार पडले. या अहवालात पुढे असे अधोरेखित करण्यात आले आहे की, ऑफिसच्या जागा घेण्यात लघु (10,000 चौ. फुटांहून कमी) ते मध्यम (10,000-50,000 चौ. फूट) आकाराच्या व्यवहारांनी चालना दिली. त्याचप्रमाणे निवडक मायक्रो-मार्पेटमध्ये-नव्या सीबीडीमध्ये (बीकेसी) भाडय़ाने जागा घेण्याचे प्रमाण गेल्या तिमाहीच्या तुलनेने 1 ते 4 टक्के वाढले. सीबीआरई इंडिया, आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेचे अध्यक्ष व सीईओ अंशुमन मॅगझिन म्हणाले, कोरोनाच्या नियमांमध्ये होणाऱया बदलांसह आणि 2021 या वर्षात ऑफिस भाडे व्यवहार पूर्ववत होण्याच्या मार्गावर गेल्याने 2022 मध्येही सकारात्मक वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.