
गीतांजली जेम्स आणि पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार संशयित मेहुल चोक्सी याची इगतपुरीच्या मुंढेगाव येथील जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे. या जमिनीचे व्यवहार करण्यात येऊ नये, अशा सूचना उपनिबंधक आणि तहसील कार्यालयाला दिल्या आहेत.
घोटाळ्यातील पैशातून त्याने इगतपुरीतील मुंढेगावजवळील बळवंतनगर शिवारात जमीन खरेदी केली होती. एसईझेडच्या नावाखाली त्याने ही जमीन खरेदी करून या ठिकाणी मोठे उद्योग येणार आहेत, असे त्यावेळी स्थानिकांना खोटे सांगितले होते.


























































