मोटारीच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू; बोपदेव घाटातील अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटात झाला असून कोंढवा पोलीस मोटार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. दुर्गा राजेंद्र येनपुरे (वय 51, रा. साई किरण अपार्टमेंट, आंबेगाव दाभाडी) यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचे पती राजेंद्र येनपुरे ( वय 48, रा. आंबेगाव दाभाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

भुगावमधील मराठी शाळेत दुर्गा शिक्षीका म्हणून नोकरीस होत्या. शनिवारी त्या नातेपुते येथील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर पुन्हा बोपदेव घाटातून त्या घरी परतत होत्या. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. त्या धडकेने दुर्गा रस्त्यावर कोसळल्या. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार प्रताप डोईफोडे अधिक तपास करीत आहेत.