मुंबईत कोरोनाचे 85 नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना मुंबईतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शहरात मंगळवारी 45 दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली. 24 तासांत कोरोनाचे 85 नवीन रुग्ण आढळले. इतर राज्यांतही कोरोनाचा उद्रेक होऊ झाल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह पाच राज्यांना दुसऱ्यांदा पत्र पाठवून अलर्ट केले आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाटय़ाने पसरायला सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.