
कांचनगंगा हे हिमालय पर्वतरांगातील एक उंच पर्वतशिखर असून ते सिक्कीम राज्यात आहे. त्याची उंची 8586 मीटर म्हणजेच 28 हजार 169 फूट इतकी आहे. माऊंट एव्हरेस्ट आणि के 2 यांच्यानंतरचे कांचनगंगा हे तिसरे सर्वात उंच शिखर आहे. प्रियंकाने गुरुवारी सकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी कांचनगंगा शिखर सर करण्याच-ाr मोहीम फत्ते केली. या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कुटुंबीयांनी आणि गिर्यारोहकप्रेमींनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.
प्रियंका हिने यापूर्वीदेखील विविध पर्वत शिखरांवर यशस्वी चढाई करत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. एप्रिल 2021 मध्ये तिने अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई केली होती. समुद्रसपाटीपासून याची उंची 8091 मीटर आहे. ही मोहीम सर करणारी ती पहिली महिला ठरली होती. 2016 मध्ये माऊंट किलिमंजारो तर 2018 मध्ये माऊंट ल्होत्से, माऊंट मकालू शिखर तिने सर केले होते. 2013 साली जगातील सर्वाधिक उंचीचे माऊंट एव्हरेस्ट गाठले. समुद्रसपाटीपासून याची उंची 8849 मीटर आहे.
साताऱ्यातील प्रियंका मोहिते या 30 वर्षीय गिर्यारोहक तरुणीने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. कांचनगंगा या खडतर पर्वत शिखरावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम तिने केला असून ही किमया करणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला ठरली आहे.


























































