
“शेर बुढा हूवा, फिर भी शेर होता है “. स्वतःच मोठापणं सांगायला हमखास वापरला जाणारा संवाद. मात्र म्हातारपण आलं की जंगलाचा राजाची अवस्थाही केविलवाणे होते, याचा प्रत्यय चंद्रपुरात आला.
म्हातारपणाने पार खंगलेल्या एका वाघाचे छायाचित्र समोर आले आहेत. छायाचित्रात वाघाचा बरगड्या दिसत आहे. अतिशय थकलेल्या या वाघाला चालणेही कठिण झालयं. हा वाघ चंद्रपूरलगतच्या दुर्गापूर कोळसा खाणीच्या ओव्हरबर्डनजवळ दिसून आला.
वनविभागाकडून वाघाचा हालचाली टिपल्या जात आहेत. हा वाघ वृद्ध आहे. तो शिकार करू शकत नाही. त्यामुळे तो उपाशी आहे. अशक्त झालेला आहे. या भागातील ट्रक्टर चालकांना हा वाघ काटेरी झुडपात निपचित पडलेला दिसला.





























































