जोगेश्वरी-विक्रोळी लिंक पूल 12 दिवस बंद, एक्सपॅन्शन जॉइंट बदलण्यासाठी राहणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या पश्चिम व पूर्व उपनगराला जोडणारा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड पुलावरील सांधे (एक्सपॅन्शन जॉइंट) बदलण्याचे काम करण्यात येणार असून त्यासाठी 13 ते 24 मेदरम्यान पूल वाहतुकीला बंद राहणार आहे. दुरुस्तीसाठी वाहतूक विभागाची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱयाने दिली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पूर्व द्रुतगती मार्गावरील जेव्हीएलआर (जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता) पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुलाच्या वेगवेगळय़ा भागांतील सांधे भरण्याचे काम 13 ते 24 मेदरम्यान केले जाणार असून या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. या 200 बेअरिंग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे.

पुलाचे 148 बेअरिंग बदलले

पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले आहे. वाहतूक बंद न करता बेअरिंग बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 200 पैकी 148 बेअरिंग बदलण्यात आली आहेत. जितके बेअरिंग बदलण्यात आले आहेत त्या भागातील एक्सपॅन्शन जॉइंट आता बदलण्यात येणार आहेत. या कामासाठी उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहे, मात्र या कालावधीत उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहणार आहे