
राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशमध्ये येण्यास भाजपचे खासदार विरोध करत आहेत. त्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे सांगितले.
देशातील भटक्या-विमुक्तांना नऊ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत सामाजिक न्याय मंत्रालय विचार करत असून, त्याबाबत लवकरच निर्णय होईल. जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडी हे फक्त मत खाण्याचे राजकारण आहे, असेही ते म्हणाले.


























































