कोकणकन्या एक्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, विलवडे स्थानकात दोन तास लटकंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेली 10111 कोकणकन्या एक्प्रेसच्या इंजिनामध्ये पहाटे साडेसहा वाजता विलकडे स्थानकांच्या दरम्यान बिघाड झाला आणि गाडी एकाच ठिकाणी तब्बल दोन तास थांबली. शांतपणे झोप घेत असलेले चाकरमानी चांगलेच घामाघूम झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया अनेक गाडय़ा विविध स्थानकांत अडकून पडल्या.

शनिवार, रविवार आणि सोमवार सुट्टी असल्यामुळे सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया गाडय़ांमध्ये प्रचंड गर्दी आहे. वेटिंगचे तिकीट असतानाही मिळेल ती जागा पकडून कोकणवासीय गावाकडे जात आहेत. रविकारी सकाळी साडेदहा वाजता गाडी विलकडे स्थानकादरम्यान येऊन थांबली. आता सुटेल, मग सुटेल म्हणताना तब्बल दोन तास ती जागेवरून हललीच नाही. प्रवाशांनी खाली उतरून पाहिल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. नंतर काही वेळाने कोकणकन्या एक्स्प्रेसचे बंद पडलेले इंजिन काढून नवीन इंजिन जोडल्यावर गाडी निवसर स्थानकात आणण्यात आली. त्यानंतर ती पुढे मार्गस्थ झाली. साडेआठ वाजता येणारी कोकणकन्या एक्स्प्रेस साडेअकरा वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकात दाखल झाली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेक रेल्वेगाडय़ा विविध स्थानकांमध्ये अडकून पडल्या होत्या. तुतारी, मंगला एक्स्प्रेस या गाडय़ाही खोळंबल्या होत्या. दुपारी 1.15 वाजता कोकणकन्या एक्प्रेस मडगाव स्थानकात दाखल झाली.