तीन महिन्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णसंख्या 200 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णसंख्या किंचित वाढल्याचे दिसू लागले आहे. तीन महिन्यांनंतर आज मुंबईतील कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा 200 वर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत 223 रुग्ण आढळले. राज्याचाही आजचा आकडा 316 होता. 12 मार्चपासून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. आज एकही कोरोनाग्रस्त दगाकल्याची नोंद नाही.

मुंबईत गेल्या 19 फेब्रुवारी रोजी कोरोना रुग्णसंख्या 201 होती. त्यानंतर रुग्णांचा दैनंदिन आकडा घसरत गेला. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात पुन्हा वाढ दिसून येत आहे. बुधवारी मुंबईथ 194 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. चालू वर्षात आतापर्यंत सर्वाधिक 259 इतकी रुग्णसंख्या 17 फेब्रुवारी रोजी होती. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 लाख 62 हजार 40 नागरिकांना त्याची लागण झाली. 19566 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवे 316 रुग्ण सापडल्यानंतर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1700 झाली आहे. सातारा, सांगली, नंदूरबार, धुळे, जालना, लातूर, हिंगोली, धाराशिक, अकोला, बुलढाणा आणि गोंदिया या जिह्यांमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही.