इंद्राणीला सीबीआय न्यायालयाकडूनही जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टानेही जामीन मंजूर केला. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढय़ाच किमतीच्या हमीवर न्यायालयाने तिची सुटका केली. मात्र कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे इंद्राणीला गुरुवारची रात्र कारागृहातच काढावी लागली. उद्या शुक्रवारी सकाळी कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर इंद्राणीची सुटका होण्याची शक्यता आहे.