देशातील रेल्वेसेवा 31 मे रोजी थांबणार; स्टेशन मास्तर सामूहिक रजेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील सर्व रेल्वे स्टेशन मास्तर 31 मे रोजी सामूहिक रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याने त्या दिवशी रेल्वेसेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

रेल्वे खात्याच्या उदासीनतेमुळे देशभरातील सुमारे 35 हजार स्टेशन मास्तरांनी रेल्वे बोर्डाला एकदिवसीय संपाची नोटीस बजावली आहे. ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशभरात सहा हजारांहून अधिक स्टेशन मास्तरांची कमतरता आहे. या पदांवर रेल्वे खाते भरतीच करीत नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक स्थानकांचा भार फक्त दोनच स्टेशन मास्तरांवर आहे.

कामाची वेळ आठ तासांची असली तरी कर्मचाऱयांच्या कमतरतेमुळे त्यांना दररोज 12 तासांची डय़ुटी करावी लागते याकडेही असोसिएशनने लक्ष वेधले आहे. यावर तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱयांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात आले.