भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार अर्जुन सिंग यांनी पक्षाला राम राम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे उपाध्यक्ष होते. अर्जुन सिंग यांनी भाजप सोडल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावरील भाजपचे सर्व झेंडे हटवले.
तीन वर्षांपूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी सिंग यांनी तृणमूल काँग्रेसची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला होता. मात्र भाजपमध्ये आल्यापासून आपल्या मतदारसंघात विकास कामे करता येत नसल्याचे सांगत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ”मला लोकांसाठी काम करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असेल.
अरुण सिंग हे सोमवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. ”लवकरच राष्ट्रीय स्तरावर एक मोठी लढाई सुरू होणार आहे.

























































