सोलापूर जिल्ह्यातील 318 पोलिसांच्या बदल्या, आयुक्तांचा जाता जाता दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस आयुक्तालयातील 318 पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, आयुक्त हरीश बैजल यांनी याबाबत आदेश दिला आहे. 31 मे रोजी आयुक्त बैजल सेवानिवृत्त होत असून, जाता जाता एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात 50 कर्मचाऱ्यांना मुख्यालयात पाठविण्यात आले आहे.

चालू वर्षी पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्यांविषयी चर्चा सुरू होती. दरम्यान, पोलीस आयुक्त बैजल हे 31 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने नवे पोलीस आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर बदलीसाठी हालचाली होतील, असा तर्क होता. मात्र, आयुक्तांनी 318 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करीत जाता जाता दणका दिला आहे.

फौजदारी चावडी, जेलरोड, सदरबझार, विजापूर नाका, सलगरवस्ती, जोडभावी पेठ, एमआयडीसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी कक्ष, नियंत्रण कक्ष, दंगा नियंत्रण पथक, सायबर सेल, पोलीस मुख्यालय, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला सुरक्षा विभाग, नागरी सुविधा केंद्र, मोटार परिवहन विभाग आदी विभागांतील तब्बल 318 कर्मचाऱयांच्या बदल्या केल्या असून, यांतील 50 कर्मचाऱयांना पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले आहे.