
तुमच्या घरी कोणताही जुना फोर जी फोन असल्यास तुम्ही जिओफोन नेक्स्टवर दोन हजार रुपयांची सूट मिळवू शकता. रिलायन्स रिटेलने मर्यादित काळासाठी जिओफोन नेक्स्ट ‘एक्स्चेंज टू अपग्रेड’ ऑफर लाँच केली आहे. जिओफोन नेक्स्टची किंमत 6499 रुपये आहे, जी डिस्काऊंटनंतर 4499 रुपये होईल. परवडणारा स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट बनवण्यासाठी रिलायन्स जिओ आणि गुगलने एकत्र संशोधन केले आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील जिओ मार्ट आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरला भेट द्यावी लागेल. या स्मार्टफोनमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत. त्याच्या कॅमेऱयामधील ट्रान्सलेशन फीचरच्या माध्यमातून कोणत्याही भाषेतील मजकुराचा फोटो काढून तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या भाषेत भाषांतरित करू शकता आणि ते ऐकूही शकता.


























































