
अमेरिका आणि युरोपसह जगातील 12 हून जास्त देशांमध्ये पसरत असलेल्या मंकीपॉक्स व्हायरसवर अँटीव्हायरल औषधे गुणकारी आहेत, असे ‘लॅन्सेट’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी आहेत. ती लक्षणे कमी करतात आणि रोगमुक्त होण्यासाठीही लक्षणीय मदत करतात. ब्रिटनमध्ये याबाबतचा अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन ब्रिटनमधील मंकीपॉक्सच्या सात रुग्णांवर करण्यात आले. या सात रुग्णांपैकी तीन रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून आले होते आणि उर्वरित चार रुग्णांना एकापासून दुसऱयाला संसर्ग झाला होता.



























































