
युजर्सला रोजच्या जीवनात उपयुक्त ठरतील असे फीचर गुगल मॅप सादर करत असते. काही महिन्यांपूर्वी गुगलने टोल नसलेले रस्ते दाखवण्यास सुरुवात केली होती. आता गुगल मॅपवर हवेची गुणवत्ता समजणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडायला हवेची चांगली स्थिती आहे की नाही, याचा अंदाज येईल.
गुगल मॅपने जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एअर क्वॉलिटी फीचर युजर्सच्या भेटीला आणले आहे. फीचरच्या नावावरून समजतंय की, हे फीचर युजर्सना ते ज्या ठिकाणी आहेत, तिथली एअर क्वॉलिटी इंडेक्ससंबंधित सूचना देते. आऊटडोअर ऑक्टिविटीसाठी मार्गदर्शन करते. फीचर आता अँड्रॉईड आणि काही आयफोनमध्येदेखील उपलब्ध होईल, अशी कंपनीने घोषणा केली.
































































