
वाहनचोरी करणाऱ्या सराईताला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 20 हजारांचा छोटा मालवाहू टेम्पो जप्त करण्यात आला आहे. उरळी देवाची परिसरातून टेम्पो चोरल्याची कबुली त्याने दिली. सोमनाथ अतिश लांबतुरे (वय – 22, रा. उरुळी देवाची हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने युनीट दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी चोरीचा टेम्पो घेऊन एकजण गोळीबार मैदान परिसरात असल्याची माहिती शंकर नेवसे आणि प्रमोद कोकणे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून सोमनाथ लांबतुरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उरळी देवाची परिसरातून टेम्पोच चोरल्याची कबुली दिली. यापुर्वीही त्याने वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
ही कामगिरी एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, एपीआय विशाल मोहिते, राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, शंकर नेवसे, प्रमोद कोकणे थोरात, चव्हाण, पवार, संजय जाधव, मोहसीन शेख, नामदेव रेणुसे, साधना ताम्हाणे, उत्तम तारू, गजानन सोनुने, समीर पटेल, कादिर शेख, निखिल जाधव यांनी केली

























































