
पुण्यात वडिलांवर वार करणाऱ्या मुलासह जावयाला खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजिंक्य विनायचद्र नाईक, शिवा विनय चंद्र नाईक, विशाल रामा कुमावत यांना अटक केली आहे.
खंडणी विरोधी पथक एकचे पथक आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी वडिलांना मारहाण करणारा मुलगा आणि जावई आंबेगाव बुद्रूक परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र लांडगे आणि प्रफुल चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, एपीआय अभिजित पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसुंदर, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, प्रफुल चव्हाण यांनी पार पाडली.



























































