गोव्यात मुसळधार पाऊस सुरूच; पुढचे 3 दिवस यलो अलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात गुरुवार प्रमाणे आज शुक्रवारी देखील पावसाचा जोर कायम आहे. पुढील 3 दिवसात उत्तर आणि दक्षिण गोव्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामन खात्याने वर्तवली आसून, मच्छिमारांना 5 दिवसांचा इशारा दिला आहे.

दक्षिण गुजरातच्या किनार्‍यापासून कर्नाटक किनार्‍यापर्यंत वाहणारे समुद्रसपाटीपासून दूर जाणारे कुंड आणि महाराष्ट्राच्या किनार्‍यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावरील चक्रीवादळ हे समुद्रसपाटीपासून सरासरी 4.5 किमी पर्यंत पसरलेले असल्याने पावसाचा जोर वाढला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याला गुरुवारी मूसळधार पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात राज्यात सरासरी 37.6 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी दुपारी केवळ दोनच तासांत सुमारे 60 मिमी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत होऊन वाहतुकीवरही विपरित परिणाम झाला. पुढील तीन दिवसही असाच मुसळधार पाऊस पडणार असून हवामान खात्याने सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट बजावला आहे.