परतुर रेल्वे स्थानकावर संभाजीनगर एक्स्प्रेसमधून धूर, प्रसंगावधान राखत रेल्वे रोखली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या निर्धारित वेळेत हैदराबाद वरून संभाजीनगरकडे जाणारी संभाजीनगर एक्स्प्रेस ही गाडी जालना जिल्ह्यातील परतूर रेल्वे स्थानकावर आली. पुढील मार्गस्थ करण्यात तयार असताना अचानक एका डब्यातील खालील भागातून धूर निघत असल्याचं स्टेशन मास्तर यांच्या लक्षात आलं आणि गाडी थांबवण्यात आली.

ही बाब 23 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. हैद्राबादवरून संभाजीनगरकडे निघालेल्या संभाजीनगर एक्सप्रेस रेल्वे स्थानकावर आली. एस 5 या डब्यातून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता.

यावेळी एक्स्प्रेसच्या गार्ड व चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी परतूर स्थानकावर उभी केली. यावेळी सदरील गाडी स्थानकावर जवळपास अर्धा तास उभी करण्यात आली होती त्यानंतर पुढील मार्गस्थ झाली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. प्रवाशांनी भरलेल्या एक्स्प्रेस गाडीसोबत मोठी दुर्घटना अगदी थोडक्यात टळली आहे.